शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेची सरकारला माहिती नाही, सहकार व पणन मंत्र्याचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:43 IST

सरकारचा संबंध नाही, संबंधित ‘त्या’ व्यापाºयांवर कारवाई करणार

ठळक मुद्देसाखर कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू करण्याचा विचारदेशातील उसाचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी वाढलेनैसर्गिक स्थिती अनुकूल असल्याने साखर उताºयातही वाढ

सोलापूर : पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेची सरकारला माहिती नाही. व्यापाºयाने बेकायदेशीरपणे ही साखर आयात केली असावी. त्या व्यापाºयाची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याचा इशारा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, साखरेवरील आयातशुल्क वाढविल्यामुळे ती आयात करणे कोणालाच परवडणारे नाही. माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या काळात देशात साखर आयात केलेली नाही. 

गतवर्षी साखरेचा प्रतिटन दर ३ हजार ५०० रुपये असताना उसाची एफआरपी जाहीर करण्यात आली. आज ही साखर २ हजार ५०० रुपये प्रतिटन दराने विकली जाते. त्यामुळे साखर कारखानेदेखील अडचणीत आल्याची कबुली सहकारमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारने निर्यात साखरेवर ५५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे; मात्र ही रक्कम पुरेशी नाही. साखरेच्या दरावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार आहे. आठवडाभरात ही भेट होईल आणि त्यावर निश्चित तोडगा निघेल, अशी माहिती सहकारमंत्र्यांनी दिली.

साखर उताºयात वाढयंदा अनपेक्षितपणे देशातील उसाचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर नैसर्गिक स्थिती अनुकूल असल्याने साखर उताºयातही वाढ झाली. 

आॅक्टोबरमध्येच कारखाने सुरु करणारआगामी गळीत हंगामात साखर कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू करण्याचा विचार आहे. हंगामातील पहिले दोन महिने कच्ची साखर उत्पादित करून ती निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. इथेनॉल निर्मितीसाठी उत्सुक असलेल्या कारखान्यांना परवाने दिले जातील. त्यामुळे साखर उत्पादन घटण्यास मदत होऊन उपपदार्थनिर्मिती वाढेल, असे सहकारमंत्री म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुखPakistanपाकिस्तान