शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

Good News; सोलापूर स्मार्ट सिटीच्या योजनेतून तीन गावांची भागणार तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 10:45 IST

कंपनीच्या बैठकीत मिळाली मंजुरी; होटगी स्टेशन, फताटेवाडी आणि आहेरवाडीचा समावेश

ठळक मुद्देलक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत एक्झीबिशन सेंटर होम मैदानावर कार्यक्रमास बंदी, पार्क स्टेडियम केवळ खेळांसाठी राखीव जाहीर सभा, प्रदर्शने यासाठी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत नव्याने मैदान विकसित करण्याचा निर्णय

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून होटगी स्टेशन, फताटेवाडी आणि आहेरवाडी या तीन गावची पाणीपुरवठा योजना करण्यास सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनी (स्मार्ट सिटी) च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

स्मार्ट सिटी कंपनीची बैठक गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झाली. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे होते. महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कंपनीचे सीईओ दीपक तावरे, सभागृह नेते श्रीनिवास करली, कंपनीचे संचालक प्रा. नरेंद्र काटीकर, अविनाश पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, नगररचनाचे सहायक संचालक लक्ष्मण चलवादी, मुख्य तांत्रिक अधिकारी विजय राठोड, पाणीपुरवठा विभागाचे संजय धनशेट्टी, समन्वयक तपन डंके आदी उपस्थित होते. कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर अनुपस्थित होते.

उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामासाठी एनटीपीसीने स्मार्ट सिटी कंपनीला २५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी मंजूर करताना एनटीपीसीने होटगी स्टेशन, फताटेवाडी, आहेरवाडी या तीन गावांना पाणीपुरवठा करण्याची अट स्मार्ट सिटी कंपनीला घातली होती. महापालिकेने समांतर जलवाहिनीची ४५० कोटी रुपयांची पहिली निविदा काढताना या तीन गावच्या पाणीपुरवठा योजना कामाचा समावेश केला होता, परंतु मक्तेदाराने हे काम जादा दराने मागताना तीन गावची पाणीपुरवठा योजना वगळण्यास सांगितले. त्यानुसार हे काम वगळण्यात आले. 

दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने या कामासाठी नव्याने १५ कोटी रुपयांची तरतूद केली. सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातून होटगी, फताटेवाडी आणि आहेरवाडी गावची पाणीपुरवठा राबविण्यात येईल. या कामाची निविदा लवकरच निघेल, असे सीईओ दीपक तावरे यांनी सांगितले. 

सात रस्ता येथील बस डेपोच्या जागेत स्मार्ट पार्किंग, व्यापारी संकुल, अत्याधुनिक ग्रंथालय असे सेंटर असावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्याबाबत पुढील बैठकीत चर्चा करण्याचा निर्णय झाला. 

महिलांसाठी हवा स्वतंत्र जिमखाना

  • - पार्क स्टेडियमवर क्रिकेटचे मैदान आणि इतर कामे सुरू आहेत. याशिवाय पॅव्हेलियनच्या बाजूला व्हॉलिबॉल मैदान आणि अत्याधुनिक जिमखाना करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी दीड कोटी रुपये मंजूर केले. पुरुषांसोबत महिलांसाठी स्वतंत्र जिमखाना असावा, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे तावरे यांनी सांगितले. 
  • लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत एक्झीबिशन सेंटर 
  • - होम मैदानावर कार्यक्रमास बंदी आहे. पार्क स्टेडियम केवळ खेळांसाठी राखीव आहे. त्यामुळे जाहीर सभा, प्रदर्शने यासाठी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत नव्याने मैदान विकसित करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत झाला. या कामासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच आराखडा तयार होईल, असेही तावरे यांनी सांगितले. 
टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका