सोलापुरातील तळीरामांसाठी आनंदाची बातमी; शनिवारपासून सुरू होणार मद्य विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 17:09 IST2020-06-11T17:08:18+5:302020-06-11T17:09:06+5:30
पालकमंत्र्यांच्या बैठकीत झाली चर्चा; महसुलमध्ये वाढ करण्यासाठी घेतला निर्णय

सोलापुरातील तळीरामांसाठी आनंदाची बातमी; शनिवारपासून सुरू होणार मद्य विक्री
सोलापूर : लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीस बंदी होती. यामुळे तळीरामामध्ये मोठी बैचेनी निर्माण झाली होती. याचबरोबर राज्याच्या महसुलीमध्ये होणारी घट लक्षात घेता राज्य शासनाने राज्यात मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.
सोलापूरमध्ये अद्यापपर्यंत दारु विक्री सुरू करण्यात आली नव्हती, गुरूवारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदी प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शनिवारपासून मद्य विक्रीस परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे़. यामुळे शनिवारपासून मद्य विक्री होणार असून फिजिकल डिस्टन्सिंगबाबत कोणते नियम असणार आहेत. याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.