सोलापूरकरांसाठी Good News; ऑनलाइन कर भरल्यास मिळणार ६ टक्के सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 14:24 IST2021-06-29T14:23:32+5:302021-06-29T14:24:07+5:30
सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची अभिनव कल्पना

सोलापूरकरांसाठी Good News; ऑनलाइन कर भरल्यास मिळणार ६ टक्के सवलत
सोलापूर - सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील २ लाख ३५ हजार मिळकत कराचे बिले तयार करण्यात आले असून त्यांचे वाटप कालपासून सुरू करण्यात आली आहे. मिळकत कराचे बिल मिळाल्यानंतर पुढील १५ दिवसात आपण ऑनलाईन बिल भरल्यास 6 टक्के तर ऑफलाइन पद्धतीने मिळकत कर भरल्यास ५ टक्केच सवलत देण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले आहे.
त्या व्यतिरिक्त मिळकत कर भरण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत केंद्र हुतात्मा स्मृती मंदिर येथे 1 जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसात शहरातील सर्व मिळकत करांना त्यांचे बिल वाटप होतील. ज्या मिळकत करांनी रेन हार्वेस्टिंग केले आहे. अशांना 2 ते 5 टक्क्यांपर्यंत सूट अधिकचे देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या रेन हार्वेस्टिंग साठी सुरु करण्यात आलेल्या अप्लिकेशन मध्ये आत्तापर्यंत 30 मिळकत करांनी यात आपले अर्ज भरले आहे.तरी नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी रेन हार्वेस्टिंग केले असल्यास महापालिकेच्या अप्लिकेशन मध्ये आपली माहिती भरून 10 टक्के पर्यंत मिळकत करावर सवलतीचा लाभ घ्यावा अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.