Good News; आजपासून सिटी बस सेवा सुरू; या मार्गावर धावणार महानगरपालिकेची बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 08:51 IST2020-11-11T08:51:34+5:302020-11-11T08:51:43+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Good News; आजपासून सिटी बस सेवा सुरू; या मार्गावर धावणार महानगरपालिकेची बस
सोलापूर : शहरासह ग्रामीण भागातील मार्गावर बुधवारपासून पुन्हा महापालिकेची सिटी बस धावणार आहे. सहायक आयुक्त श्रीराम पवार यांनी याबाबत माहिती दिली.
शहरात बुधवारपासूनमार्ग क्र. ७ सैफूल, मार्ग क्र. ८ साखर कारखाना, मार्ग क्र. १६ गोदूताई घरकूल, मार्गक्र. २२ राजस्वनगर (व्हाया निर्मितीनगर), मार्ग क्र. २४ राजस्वनगर (व्हाया सुंदरमनगर),मार्ग क्र. ३० गोदूताई घरकूल, मार्ग क्र. ४१ जुना विडी घरकूल, मार्ग क्र. ४७ ज्ञानेश्वरनगर, मार्ग क्र. ५७ देसाई नगर व मार्ग क्र. ५९ मित्र नगर येथील बससेवा सकाळ आणि दुपारच्यासत्रात सुरू राहील.
ग्रामीण भागात मार्ग क्र. १५ क संगदरी, मार्ग क्र. ५५ कासेगाव,मार्ग क्र. ६२ देवकुरळी, मार्ग क्र. ६४ चपळगाव, मार्ग क्र. ६५ चंद्रमौळी मोहोळ, मार्गक्र. ७० मुस्ती, मार्ग क्र. ७२ मार्डी, वडगाव, मार्ग क्र. ७३ मंद्रूप, विंचूर, मार्गक्र. ७५ बीबी दारफळ, मार्ग क्र. ७७ पितापूर, नन्हेगाव, मार्ग क्र. ८३ खडकी, धोत्री,मार्ग क्र. ९५ पानमंगळूर या मार्गावर सकाळ आणि दुपारच्या सत्रात बससेवा सुरू राहणार आहे.