शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळविले

By admin | Published: July 24, 2014 1:17 AM

सोन्याचे गंठण हिसका मारून पळवून

सोलापूर : न्यायाधीश डी. एस. मराठे यांच्या घरासमोर मैत्रिणीची वाट पाहत असताना अज्ञात दोन मोटरसायकलस्वारांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मीरा नरहरीराव शिंदे (वय ५८, रा. क्रीडा संकुलसमोर कुमठा नाका) यांच्या गळ्यातील १४ हजार किमतीचे सोन्याचे गंठण हिसका मारून पळवून नेले. हा प्रकार बुधवारी सकाळी ६.२0 वा. न्यायाधीश मराठे यांच्या घरासमोर घडला. मीरा शिंदे या त्यांची मैत्रीण मराठे यांची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून अज्ञात दोन इसम तेथे आले. त्यातील एकजण खाली उतरून आपटे यांच्या राहण्याचा पत्ता विचारला. मीरा शिंदे यांनी कोणते आपटे असे विचारले असता पत्ता सांगण्याचा बहाणा करीत तो इसम जवळ आला त्याने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसका मारून काढले व मोटरसायकलवर बसून पोबारा केला. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि कोळेकर करीत आहेत.