शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सील; कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस

By appasaheb.patil | Updated: April 26, 2024 14:29 IST

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर-गुरसाळे, (ता.  पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या ३ गोडाऊनला सिल केले.

सचिन कांबळे

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, (ता.  पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या ३ गोडाऊनला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिल केले आहे.

वेणूनगर-गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.,  ची चल मालमत्तेचा (साखरसाठा) ताबा दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांचे मार्फत प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी सेक्युरिटायझेशन कायदा २००२, कलम १३ (४) अन्वये तसेच डी. आर.टी कोर्ट, पुणे दावा क्र.एस.ए.६२/२०२४ मध्ये  २५ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या सुनावणी मध्ये मा. कोर्टाने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँकेच्या, सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्ता जप्ती अनुषंगाने दिलेला स्टे उठविल्यानुसार व पुरक नियमाप्रमाणे २६ एप्रिल २०२४ रोजी ताबा घेतला आहे.

सर्व कर्जदार व आम जनतेस सुचित करण्यात येते की, सदर उपरोक्त कारखान्याच्या चल मालमत्तेचा कोणाशीही कुठल्याही प्रकारचा हस्तांतर/तबलीचा/ विक्रीचा व्यवहार करू नये अशा प्रकारचे व्यवहार केल्यास ते बेकायदेशीर ठरतील यांची नोंद घ्यावी. असे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकचे प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट  यांनी आवाहन केले आहे.

'न्यायालयात केस चालू होती, काल स्टे उठला आहे. आणि आज सकाळी तात्काळ अधिकाऱ्यानी गोडाऊन सील केले आहे. १ लाख पोती साखर शिल्लक आहे. साखर विकून शेतकऱ्यांची भेट द्यायची होती. 

-: अभिजीत पाटील, अध्यक्ष श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना

टॅग्स :Solapurसोलापूर