पंचफुला गायकवाड यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST2021-01-13T04:57:04+5:302021-01-13T04:57:04+5:30

कुसळंब : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने पांगरी येथील मुलांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ...

Glory to Panchfula Gaikwad | पंचफुला गायकवाड यांचा गौरव

पंचफुला गायकवाड यांचा गौरव

कुसळंब : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने पांगरी येथील मुलांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका पंचफुला गायकवाड-बगाडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. स्टेशन रोड पुणे येथील सांस्कृतिक भवनात शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव सत्यजित जानराव, प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, संघटक नईम इनामदार, केंद्र प्रमुख श्रीहरी गायकवाड, सरपंच ईन्नुस पटेल, केंद्रीय मुख्याध्यापक शैला कुलकर्णी, सुरेखा हंगे, अनुसया माचेवाड, हिराबाई क्षीरसागर, बाबासाहेब शिंदे, गणेश गोडसे, संजय बोकेफोडे, आबासाहेब घावटे, बालाजी मुळे, अतुल खाडे, प्रताप चौधरी, उमेश गाढवे, मनोज गादेकर, दीपक काळे, परमेश्वर कोल्हे, माधव सांगळे, धनंजय बगाडे, सुभाष पवार, प्रगती बगाडे, प्रतीक बगाडे, केतन बगाडे, किशोरकुमार बगाडे उपस्थित होते.

----

फोटो : १२ पंचफुला गायकवाड

पंचफुला गायकवाड यांच्या गौरवप्रसंगी औदुंबर उकिरडे, शैला कुलकर्णी, सुरेखा हंगे, उमेश गाढवे, हिराबाई क्षीरसागर आदी.

Web Title: Glory to Panchfula Gaikwad