शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

विजय शुगर्सचा ताबा जिल्हा बँकेकडेच द्या ! जिल्हाधिकाºयांचा आदेश, शिवरत्न उद्योग समूहाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:59 AM

१७६ कोटी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर्स कारखान्याचा ताबा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिवरत्न उद्योग समूहाला दिले. 

ठळक मुद्देवसुलीसाठी साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांमार्फत आरआरसी कायद्यांतर्गत कारवाईसाठी पत्रवसुलीसाठी जिल्हाधिकाºयांनी कारखान्याचा ताबा घेऊन मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली चार दिवसात तहसीलदारांमार्फत ताबा देण्याची कारवाई होईल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : १७६ कोटी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर्स कारखान्याचा ताबा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी शिवरत्न उद्योग समूहाला दिले. विजय शुगर्सने जिल्हा बँकेचे १७६ कोटी ६२ लाखांचे कर्ज थकविले आहे. त्याच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा द्यावा, यासाठी जिल्हा बँक जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करीत आहे. शिवरत्न उद्योग समूहाने आजारी उद्योगांतर्गत एआरटीकडे अर्ज दाखल केला होता. तिथेही बँकेच्या बाजूने निर्णय देण्यात आला. दरम्यान, विजय शुगर्सने एफआरपीची रक्कमही थकविली आहे. त्याच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाºयांनी कारखान्याचा ताबा घेऊन मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेला जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवली. जिल्हाधिकाºयांनी कारखान्याची मालमत्ता आमच्या ताब्यात द्यावी, आम्ही एफआरपीची रक्कम देऊ आणि आमचे कर्जही वसूल करू, अशी भूमिका बँकेच्या संचालक मंडळाने घेतली. जिल्हाधिकाºयांकडे गेल्या दोन महिन्यात यासंदर्भात सुनावण्या झाल्या. अखेर सोमवारी जिल्हाधिकाºयांनी कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा जिल्हा बँकेला देण्याचे आदेश दिले. चार दिवसात तहसीलदारांमार्फत ताबा देण्याची कारवाई होईल. ----------------------‘आरआरसी’चे साखर आयुक्त पाहून घेतील- विजय शुगर्सने कारखान्याला ऊस घालणाºया शेतकºयांचे एफआरपीसह २० कोटी रुपये थकविले आहेत. त्याच्या वसुलीसाठी साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांमार्फत आरआरसी कायद्यांतर्गत कारवाईसाठी पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी कारखान्यावर कारवाई केली होती. मात्र आता सरफेसी हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे त्याला प्राधान्य देऊन जिल्हा बँकेला ताबा देण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. आरआरसीनुसार वसुलीचे काय करायचे याचा निर्णय साखर आयुक्तच घेतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. -----------------------सरफेसीचे अधिकार जिल्हा बँकेला नाहीत- सरफेसी कायद्यांतर्गत विजय शुगर्सचा ताबा घेण्याचे अधिकार जिल्हा बँकेला लागू होत नाहीत, असे मत विजय शुगर्सच्या वकिलांनी मांडले. त्यासाठी त्यांनी केरळ येथील प्रकरणाचा संदर्भ दिला. ते प्रकरण सर्वाेच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले. २००२ च्या सरफेसी कायद्याबाबतच्या नोटिफिकेशनमध्ये बँक या संज्ञेत जिल्हा बँकेचा समावेश आहे. न्यायमूर्तींसमोरील प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आपण दिलेल्या निकालावर फेरविचार व्हावा, अशी अट देऊन त्यांनी जिल्हा बँकेला ताबा देण्याचे आदेश दिले.  

टॅग्स :Solapurसोलापूर