झोप येत नाही म्हणून तिनं खाल्या एकदाच तीन गोळ्या, सोलापुरातील प्रकार
By विलास जळकोटकर | Updated: July 10, 2023 17:27 IST2023-07-10T17:27:07+5:302023-07-10T17:27:20+5:30
त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात उपचार

झोप येत नाही म्हणून तिनं खाल्या एकदाच तीन गोळ्या, सोलापुरातील प्रकार
सोलापूर : कोणतंही औषध वा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत अशा सूचना असतानाही महिलेनं झोप येत नाही म्हणून एकदाच तीन गोळ्या खाल्या. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सेटलमेंट फ्री कॉलनीत ही घटना घडली. मनिषा संदीप गायकवाड (वय- २५) असे या महिलेचे नाव आहे.
यातील जखमी महिला ही सेटलमेंट फ्री कॉलनीमध्ये वास्तव्यास आहे. नेहमीच झोप येत नसल्याने त्रासली होती. वैतागून तिने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एकाचवेळी तीन गोळ्या खाल्या. काही वेळानं त्रास होऊ लागला. लागलीच शासकीय रुग्णालय गाठले. सध्या प्रकृती स्थिर असून, उपचार सुरु आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.