मोठी कारवाई! वेळापुरातील दोघांकडे आढळले गावठी पिस्टल अन् दोन काडतूसे

By Appasaheb.patil | Updated: July 9, 2023 19:08 IST2023-07-09T19:07:51+5:302023-07-09T19:08:00+5:30

ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वेळापूर पोलिसांनी केली.

Gavathi pistol and two cartridges were found in the possession of two people from Gharipura | मोठी कारवाई! वेळापुरातील दोघांकडे आढळले गावठी पिस्टल अन् दोन काडतूसे

मोठी कारवाई! वेळापुरातील दोघांकडे आढळले गावठी पिस्टल अन् दोन काडतूसे

सोलापूर : वेळापूर (ता. माळशिरस) येथील दोघांकडे लोखंडी गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वेळापूर पोलिसांनी केली. याबाबत पेालिसांनी दिलेली माहिती अशी की, अवधुत नारायण शेंडगे (रा. पिसेवाडी) व हरीदास नागनाथ जाधव (रा. खंडाळी ता.माळशिरस) यांच्याकडेएक अवैद्य लोखंडी गावठी पिस्टल मॅगजिन असलेली त्याची संपूर्ण लांबी ७ इंच, बॅरलची लांबी ६ इंच, काळया रंगाची, मुठीस प्लॅस्टिकचे लाल रंगाचे कव्हर असलेले व त्यावर दोन्ही बाजूस पंचकोनी स्टार आहेत. 

मुठीची लांबी ४ इंच आहे. याशिवाय २ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याबाबत वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बागाव, रेगुडे, पोलिस नाईक आनंदपुरे, पोलिस कॉन्स्टेबल नवले, क्षीरसागर यांनी केली. याशिवाय सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वाळू चोरीचे ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६ ब्रास वाळू व वाहन असा एकूण ७ लाख ३१ हजार ९२० रूपयांचा माल जप्त केला आहे.

Web Title: Gavathi pistol and two cartridges were found in the possession of two people from Gharipura