सोलापूरजवळ गॅसचा स्फोट, जिवितहानी नाही
By Admin | Updated: February 25, 2017 21:30 IST2017-02-25T21:30:19+5:302017-02-25T21:30:19+5:30
सोलापूरजवळ गॅसचा स्फोट, जिवितहानी नाही

सोलापूरजवळ गॅसचा स्फोट, जिवितहानी नाही
सोलापूरजवळ गॅसचा स्फोट, जिवितहानी नाही
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे घरातील गॅसचा स्फोट झाला़ या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही़ मात्र संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना शनिवार २५ फेबु्रवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली़
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील हरिदास श्रीराम चव्हाण (रा़ कुसूर रोड, विंचूर ) यांच्या शेतातील घरातील गॅसचा अचानक स्फोट झाला़ या स्फोटात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ या घटनेची माहिती समजताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली़ यावेळी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी व बचाव कार्यासाठी मदत केली़