शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

अक्कलकोट, माळशिरस तालुक्यात गारपिट; द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू जमीनदोस्त

By विठ्ठल खेळगी | Updated: March 18, 2023 18:38 IST

द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सोलापूर: शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अक्कलकोट, माळशिरस तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हवामान विभागाने यापूर्वीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये मात्र या अवकाळी पावसामुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री सुमारास चपळगाव, बोरेगाव, हन्नुर  नागणसूर, किणी,वागदरी, बोरोटी,     पानमंगरूळ, तडवळ, चुंगी, अक्कलकोट परिसर यासह विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा व विजेच्या कडकडाटामुळे वातावरणात बदल दिसून आला. तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. किणी भागात गारांचा पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बोरोटी येथील सुमारे दोनशे एकर पपई जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दोन दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

माळशिरस तालुक्यात वीस मिनिट गारपीटमाळशिरस तालुक्यातील पश्चिम भागामधील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब, सरगरवाडी, गोरडवाडी या गावात १५ ते २० मिनिटे गारपीट झाली. गहू, ज्वारी द्राक्ष  पिकाचे नुकसान झाले असून प्रभारी तहसीलदारांचा पथकासह पाहणी दौरा सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. नातेपुते, शिंदेवाडी परिसरातील गहू जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीSolapurसोलापूर