सोलापूर महापालिका परिवहन समितीच्या सभापती भाजपाचे गणेश जाधव
By Appasaheb.patil | Updated: March 8, 2019 15:07 IST2019-03-08T15:06:38+5:302019-03-08T15:07:31+5:30
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे गणेश जाधव यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली़ पिठासीन ...

सोलापूर महापालिका परिवहन समितीच्या सभापती भाजपाचे गणेश जाधव
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे गणेश जाधव यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली़ पिठासीन अधिकारी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड उपस्थित होते.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी भाजपाकडून गणेश जाधव तर शिवसेनेकडून तुकाराम मस्के यांनी अर्ज दाखल केले होते़ शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास पिठासीन अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड याच्या उपस्थितीत निवडणुक प्रक्रिया झाली़ शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले तुकाराम मस्के यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपाचे गणेश जाधव यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
परिवहन समितीत १२ सदस्य आहेत़ यात भाजपाचे ६, शिवसेनेचे २, काँग्रेसचे २ आणि एमआयएम पक्षाचे १ असे १२ सदस्यसंख्या आहे़ या निवडीनंतर नुतन परिवहन समिती सभापती गणेश जाधव यांचा डॉ़ राजेंद्र भारूड व महापौर शोभा बनशेट्टी याच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी विजय पुकाळे, तुकाराम मस्के, सगरी आदी परिवहन समितीचे सदस्य व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.