सोलापुरात ठाकरे सेनेचे अनोखे आंदोलन; गद्दार दिनानिमित्त काढली मोटारसायकल रॅली

By Appasaheb.patil | Updated: June 20, 2023 15:48 IST2023-06-20T15:48:16+5:302023-06-20T15:48:46+5:30

जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला.

gaddar din by thackeray sena in solapur motorcycle rally held | सोलापुरात ठाकरे सेनेचे अनोखे आंदोलन; गद्दार दिनानिमित्त काढली मोटारसायकल रॅली

सोलापुरात ठाकरे सेनेचे अनोखे आंदोलन; गद्दार दिनानिमित्त काढली मोटारसायकल रॅली

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २० जून हा दिन जागतिक गद्दार दिन म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख विष्णु कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व शहर उत्तर संघटक महेश धाराशिवकर यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गद्दार वृत्तीचे जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला.

नवी पेठ येथील पारस स्टेट चौक येथे शिवसैनिक जमून प्रतिकात्मक ५० खोके, जागतिक गद्दार दिनाचा फलक घेऊन जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके, जागतिक गद्दार दिनाच्या शुभेच्छा, या गद्दाराचे करायचं काय खाली मुंडी वर पाय, शिवसेना जिंदाबाद उध्दव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत नवी पेठ, सोन्या मारुती, माणिक चौक, मधला मारुती, सराफ बाजार अशी मोटार सायकल रॅली काढून  येथे समाप्त करण्यात आली. 

यावेळी रॅलीत बाळासाहेब माने, संताजी भोळे, अमित भोसले, उज्वल दीक्षित, संदीप बेळमकर, सतीश माने अमित अंजीखाने यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: gaddar din by thackeray sena in solapur motorcycle rally held