सोलापुरात रमजाननिमित्त फळबाजार तेजीत; केळी ६० रुपये डझन
By दिपक दुपारगुडे | Updated: March 31, 2023 16:30 IST2023-03-31T16:29:28+5:302023-03-31T16:30:05+5:30
गरिबांचे हक्काचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी महागली आहेत. शहरात शुक्रवारी डझनभर केळीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.

सोलापुरात रमजाननिमित्त फळबाजार तेजीत; केळी ६० रुपये डझन
सोलापूर : सध्या फळांचे भाव प्रचंड वाढले आहेत. मात्र, चांगल्या दर्जाची फळे बाजारात दिसत नाही. चांगली फळे परदेशात पाठविली जातात. स्थानिक बाजारपेठेत मात्र दुय्यम फळे मिळतात, असं बोललं जातं. सोलापूर जिल्ह्यात पिकणारा आंबा, डाळिंब, केळी, सीताफळ, बोरं, पपई, टरबूज, कलिंगड आदी फळं सोलापुरात मोठ्या प्रमाणात पिकतात, मात्र चांगल्या दर्जाचे फळ हे परदेशात विक्रीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले.
गरिबांचे हक्काचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी महागली आहेत. शहरात शुक्रवारी डझनभर केळीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. अवकाळी पावसामुळे मात्र यंदा फळांच्या किमती वाढल्या आहेत. रमजान पर्व सुरू होताच शहरातील फळबाजार तेजीत आला आहे.
असे आहेत फळांचे भाव (किलोमध्ये)
टरबूज - ६ - १०
खरबूज - १० -२०
चिकू - ३० -५०
द्राक्षे - २५ - ४०
पपई - २५ -३५
बदाम आंबा - १००-१५०
केळी - ५० ते ६० (रुपये डझन)
सफरचंद -१२०-१५०
परदेशात कोणती फळे पाठविली जातात?
सोलापूर जिल्ह्यातून केळी, डाळिंब, सीताफळ, बोरं, आंबे, कलिंगड, मनुके, द्राक्ष, पेरू, साेयाबीन, पपई, दोडका, पडवळ आदी फळं देश-परदेशात विक्रीस जातात.