‘लाइफलाइन’मध्ये ३ हजार रुग्णांना मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST2021-02-10T04:22:14+5:302021-02-10T04:22:14+5:30
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक ३०१० रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देत लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. ...

‘लाइफलाइन’मध्ये ३ हजार रुग्णांना मोफत उपचार
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक ३०१० रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देत लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय देशमुख, डॉ. मंजूषा देशमुख आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून मोफत उपचार व्हावेत यासाठी आवश्यक ते सहकार्य केले आहे.
यासंदर्भात राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे याविषयी कळविले होते. यामुळे डॉ. मंजूषा देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉ. संजय देशमुख व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोट :::::::::::::::::
कामाची दखल घेतल्यामुळे आणखी उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. शासनाच्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी लाइफलाइन हॉस्पिटल कायम प्रयत्नशील राहील.
- डॉ. संजय देशमुख
संचालक, लाइफलाइन हॉस्पिटल
फोटो ::::::::::::::::::::
डॉ. मंजूषा देशमुख यांचा सन्मान करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे.