शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरुवात; 17 मार्चपर्यंत मुदत

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 1, 2023 14:00 IST

आधार कार्डाशिवाय मिळेल प्रवेश : 17 मार्चपर्यंत मुदत

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेशास 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये २ हजार २९७ जांगावर मोफत प्रवेश मिळणार आहे.

जिल्ह्यात 295 शाळांमध्ये आरटीई कायद्यानुसार मोफत प्रवेश देण्यात येतात. शाळेतील एकूण संख्येच्या तुलनेत २५ टक्के प्रवेश हे आरटीईतून देण्यात येतात. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार (आरटीई) विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतात. वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.प्रवेश घेत असताना अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसले तरी त्यांना तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश मिळाल्यानंतर पालकांनी लवकरात लवकर आधार कार्ड जमा करणे गरजेचे आहे. 

आरटीई अतंर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा (रेशनकार्ड, वीजबिल आदी), जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय असल्यास), दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास), आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न), जन्माचा दाखला आदी कागपदत्रे द्यावे लागणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण