लक्ष्मीनगर येथे २४७ जणांची मोफत नेत्र तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:58+5:302021-07-15T04:16:58+5:30

उद्घाटन काँग्रेस कमिटीचे प्रांतिक सदस्य प्रा. पी. सी. झपके व तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच धनाजी ...

Free eye check-up of 247 persons at Laxminagar | लक्ष्मीनगर येथे २४७ जणांची मोफत नेत्र तपासणी

लक्ष्मीनगर येथे २४७ जणांची मोफत नेत्र तपासणी

उद्घाटन काँग्रेस कमिटीचे प्रांतिक सदस्य प्रा. पी. सी. झपके व तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच धनाजी बाड, उपसरपंच स्वाती साठे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. धनाजी चव्हाण, सचिव उन्मेष आटपाडीकर, उपाध्यक्ष सुनील झपके, खजिनदार काकासो नरूटे, प्रगतशील बागायतदार यशवंत नरळे, माजी सरपंच धनाजी नरळे, गोवर्धन गोडसे, सुधीर गोडसे, माजी उपसरपंच भगवान साठे, मुख्याध्यापक फाळके आदी उपस्थित होते.

लायन्स आणि ग्रामपंचायत लक्ष्मीनगर यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. महसूल प्रशासनाकडून विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तिश: माझे सहकार्य राहील, असे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. शिबिरासाठी ग्रा.पं. सदस्य दरिअप्पा खिलारे, सविता नरळे, मंदाकिनी गोडसे, राणी बाड, धर्मराज ऐवळे यांच्यासह ग्रामस्थ, लायन्स क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Free eye check-up of 247 persons at Laxminagar