‘फोन पे’ वरून पावणेतीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:19 IST2021-01-02T04:19:11+5:302021-01-02T04:19:11+5:30
हा प्रकार ३० ते ३१ डिसेंबर या कालावधीत बामणी (ता. सांगोला) येथे घडला. राजेश नाना पांढरे यांनी फसवणूक करणाऱ्या ...

‘फोन पे’ वरून पावणेतीन लाखांची फसवणूक
हा प्रकार ३० ते ३१ डिसेंबर या कालावधीत बामणी (ता. सांगोला) येथे घडला. राजेश नाना पांढरे यांनी फसवणूक करणाऱ्या ०९८८३९०३१९७ या मोबाइलधारकाच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.
बामणी (ता. सांगोला) येथील राजेश पांढरे यांचे सांगोल्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. या खात्याला ‘फोन पे’ जोडले आहे. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मित्र दत्तात्रय बंडगर याने तुझ्या मोबाइलमधील ‘फोन पे’वरून माझ्या अकाउंटवर ६ हजार रुपये पाठव, असे सांगितल्यावरून त्यांने पैसे पाठविले
अशी केली फसवणूक
टीम व्हीव्हर पे मध्ये सांगितलेला पासवर्ड आयडी टाकून त्या व्यक्तीने परस्पर टप्प्याटप्प्ययाने ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत २४ हजार ९९९, १ लाख, ५० हजार, १० हजार, १५ हजार, ५० हजार, २५ हजार असे एकूण २ लाख ७४ हजार ९९९ रुपयांची रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगोला येथील एसबीआय शाखेत धाव घेऊन त्या खात्यावरील व्यवहार बंद करण्यास सांगितले.