सोलापुरातून चौदा वर्षाचा मुलगा गायब; फूस लावून पळल्याची पित्याची तक्रार

By विलास जळकोटकर | Updated: February 7, 2024 18:25 IST2024-02-07T18:24:39+5:302024-02-07T18:25:00+5:30

यातील फिर्यादी हे मार्केट यार्डात मजूरी करुन पती-पत्नी, दोन मुलांची उपजिवीका करतात

Fourteen year old boy missing from Solapur; Father's complaint of seducing and running away | सोलापुरातून चौदा वर्षाचा मुलगा गायब; फूस लावून पळल्याची पित्याची तक्रार

सोलापुरातून चौदा वर्षाचा मुलगा गायब; फूस लावून पळल्याची पित्याची तक्रार

 सोलापूर : दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्षीय मुलगा रात्री घरातून गायब झाला असूृन, त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंकुश तुकाराम पारधे (वय- ३६) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.

रविवारी रात्री ११:३० ते सोमवारच्या पहाटे ४:३० या वेळेत तुळजाई भोसले नगर, मुळेगाव रोड येथे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. आर्यन उर्फ बापू अंकुश पारधे असे गायब झालेल्या मुलाचे नाव आहे.

यातील फिर्यादी हे मार्केट यार्डात मजूरी करुन पती-पत्नी, दोन मुलांची उपजिवीका करतात. ४ जानेवारीच्या रात्री ११:३० ते पहाटे ४:३० या वेळेत फिर्यादीचा दहावीमध्ये तुळजापूर येथील शाळेत शिकणारा मुलगा गायब झाला. तो आजारी पडल्याने सोलापूरला आई-वडिलांकडे आला होता.शोध घेऊनही तो सापडला नाही म्हणून पित्याने त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास हवालदार पोळ करीत आहेत.

Web Title: Fourteen year old boy missing from Solapur; Father's complaint of seducing and running away