शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची चौदा फुटी सिंहासनाधिष्ठ मूर्ती साकारतेय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:31 IST

कात्रजमध्ये कामास गती; सोलापुरातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत घडणार दर्शन

ठळक मुद्दे- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज स्थापन केलेआता नव्याने शिवछत्रपतींची मूर्ती बनवण्याचा निर्णय महामंडळाच्या विश्वस्तांनी घेतला आहे पुण्यातील कात्रज भागात राहणारे शिल्पकार उमेश व्हरकट यांंना मूर्तीचे काम देण्यात आले आहे

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : हातात राजदंड घेऊन सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची चौदा फुटी मूर्ती पुण्यातील कात्रजमध्ये साकारण्याचे काम सुरू असून, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीत छत्रपतींच्या या मूर्तीचे दर्शन तमाम सोलापूरकरांना घडणार असल्याचे महामंडळाचे नूतन अध्यक्ष केकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा होत असून, त्याआधी शिंदे चौकातील डाळिंबी आड मैदानावर महामंडळाच्या वतीने शिवछत्रपतींची मूर्ती प्रतिष्ठापना होत असते. आता नव्याने शिवछत्रपतींची मूर्ती बनवण्याचा निर्णय महामंडळाच्या विश्वस्तांनी घेतला आहे. पुण्यातील कात्रज भागात राहणारे शिल्पकार उमेश व्हरकट यांंना मूर्तीचे काम देण्यात आले आहे. राजे शिवछत्रपती हातात राजदंड घेऊन सिंहासनावर बसले आहेत. राजे शिवछत्रपतींची भावमुद्रा अन् हातातील राजदंड शिवप्रेमींच्या नजरेत भरणारा आहे.

शिल्पकार उमेश व्हरकट यांच्या उत्तम कलेतून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारत असून, प्रदीप कुंभार, संतोष लोणकर, प्रशांत बंजाळ, योगेश कार्लेकर, राहुल कुंभार हे सध्या मूर्ती साकारण्यात मग्न आहेत. मूर्तीतील बारकावे टिपण्यासाठी अन् मूर्तीला बघताक्षणीच साक्षात महाराजांचेच दर्शन घडावे, यासाठी सोलापूरचे शिवप्रेमी प्रवीण कदम यांनी पुणे फेºया सुरू केल्या आहेत. 

उमेश व्हरकट हे मूळचे सोलापूरचे. मुंबाईच्य जे. जे. स्कूल आॅफ आर्ट येथून त्यांनी शिल्पकलेची पदवी संपादन केली. मुरारजी पेठेतील राघवेंद्र नगरात राहणारे उमेश व्हरकट हे पुण्यातील कात्रज भागात स्थायिक झाले. त्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगावरील अनेक मूर्ती महाराष्ट्रासह परप्रांतातही पोहोचल्या आहेत. शिवजन्मोत्सव महामंडळाने यंदा त्यांना हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची सिंहासनाधिष्ठ मूर्तीचे काम दिले आहे. या मूर्ती कामासाठी चार लाख रुपये खर्च येणार असून, मूर्तिकलेत मल्टिकलरचा वापर करण्यात आला आहे. 

अध्यक्षपदाचा मान नामदेव शिंपी समाजाला-काळे- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज स्थापन केले, हाच कानमंत्र घेऊन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे यंदाचे अध्यक्षपद नामदेव शिंपी समाजाला देण्यात आल्याचे महामंडळाचे विश्वस्त तथा माजी उपमहापौर पद्माकर काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

- समाजातील सामाजिक कार्यकर्ते अन् शिवछत्रपतींचे निस्सीम भक्त असलेले अमोल अशोक केकडे यांची यंदाच्या महामंडळाच्या            अध्यक्षपदी निवड झाली. निवडीवेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे आदी उपस्थित होते. 

शालेय जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांवरील अनेक पुस्तके वाचली. त्यांचा पराक्रम, शौर्य अन् सर्वच जाती-धर्मांना पुढे घेऊन जाणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझ्यासाठी दैवत बनले. माझी ही निष्ठा पाहून महामंडळाच्या विश्वस्तांनी माझ्यासारख्या मावळ्याला अध्यक्षपद दिले, ही गौरवास्पद बाब आहे.-अमोल केकडे, नूतन अध्यक्ष, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळ

मूळचा मी सोलापूरचा. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाने मला हातात राजदंड घेतलेल्या शिवछत्रपतींची सिंहासनाधिष्ठ मूर्ती साकारण्याचे काम दिले. सोलापूरकर जेणेकरून शहरातील तमाम शिवप्रेमींची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा मनस्वी आनंद आहे. -उमेश व्हरकट, शिल्पकार, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkatrajकात्रजPuneपुणे