कोळा येथे चौघांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:49 IST2021-02-05T06:49:14+5:302021-02-05T06:49:14+5:30

कोळा येथील लक्ष्मी महादेव खंदारे आणि विनायक चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत असे. ३० जानेवारी रोजी विनायक चव्हाण ...

Four threatened to kill at Kola | कोळा येथे चौघांना जीवे मारण्याची धमकी

कोळा येथे चौघांना जीवे मारण्याची धमकी

कोळा येथील लक्ष्मी महादेव खंदारे आणि विनायक चव्हाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत असे. ३० जानेवारी रोजी विनायक चव्हाण हा मित्रांना घेऊन दुचाकीवरून लक्ष्मी खंदारे यांच्या घरासमोरून वारंवार चकरा मारत होता. त्यावेळी त्यांचा पाळीव कुत्रा चव्हाण यांच्या दुचाकीच्या पाठीमागे भुंकत गेला. त्यानंतर चव्हाण हा दोन मित्रांना घेऊन येत तुमचा कुत्रा माझ्या पायाला चावला आहे, असे म्हणत लक्ष्मीचे वडील मारुती सोनवणे यांना ढकलून दिले.

तिघांनी लक्ष्मी खंदारे, त्यांच्या भावाचा मुलगा अथर्व सोनवणे, भावजय श्रद्धा, बहिणीची मुलगी प्रियंका यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत लक्ष्मी खंदारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनायक चव्हाणसह दोन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदला आहे.

Web Title: Four threatened to kill at Kola