शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

बेकायदा बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या चार अधिकाºयांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 10:32 IST

सोलापूर : मजरेवाडी परिसरात अस्तित्वात नसलेल्या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करून बांधकाम परवाना घेणारे आणि देणाºया महानगरपालिकेच्या ४ अधिकाºयांसह ...

ठळक मुद्देबोगस कागदपत्राने जमीन हडपण्याचा प्रयत्नलामकाने, चलवादी, अवताडे, कारंजे यांचा समावेशसात-बारा उतारा तयार करून तलाठीचा बोगस सही-शिक्का केला

सोलापूर : मजरेवाडी परिसरात अस्तित्वात नसलेल्या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करून बांधकाम परवाना घेणारे आणि देणाºया महानगरपालिकेच्या ४ अधिकाºयांसह ७ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. माहिती अधिकारामध्ये ही घटना उघड झाली.

अवेक्षक बाळासाहेब गणपत लामकाने (वय ४०, रा. मोदी, सात रस्ता, सोलापूर), नगर रचना विभागाचे सहायक संचालक लक्ष्मण चलवादी, पंतप्रधान घरकूल आवास योजनेचे प्रकल्प अभियंता शांताराम आवताडे, नगर अभियंता संदीप कारंजे, अ. कय्युम महिबूबसो सिद्दिकी (रा. आंबेडकर नगर, होटगी रोड, सोलापूर), आदम युसूफ शेख (रा. सहारा नगर, होटगी रोड सोलापूर), जुनैद अ. कय्युम सिद्दिकी (रा. आंबेडकर नगर होटगी रोड सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, मजरेवाडी परिसरातील जुना सिटी सर्व्हे नं. २८३/२-अ/२/ब/२/२ असा होता. नवीन सिटी सर्व्हे नं. ४/२अ/२ब/२/२ असा असून, यापैकी कायदेशीररित्या अस्तित्वात नसलेला प्लॉट नं. १५७ याचे क्षेत्र ४६.४५ चौ.मी. या जागेचे बोगस खरेदीखत बाळासाहेब लामकाने याने करून बनावट कागदपत्रे तयार केली. सात-बारा उतारा तयार करून तलाठीचा बोगस सही-शिक्का केला. बोगस दस्त अस्तित्वात आणला आणि दस्तमधील लिहून देणार विठ्ठल नरसप्पा आवार हा आजारी असल्याचे दाखवले. 

दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्रमांक २६१८/२0१७ दि. १४ मे २00७ असा बोगस दस्त अस्तित्वात आणला. बोगस खरेदीखत व सात-बाराच्या आधारे सहारा नगर येथील खुल्या मिळकतीवर प्लॉट नं. १५७ असा दर्शवून बांधकाम परवाना क्रमांक ३८६ दि. २0 जुलै २0१0 रोजी सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन नगर अभियंता यांच्याकडून मंजूर करून घेतला. सहारा नगर येथील खुल्या प्लॉटवर बेकायदा बांधकाम करण्यास सुरुवात केली.

 म. अनिस बाबुलाल शेख (वय ५१, रा. सहारा नगर, होटगी रोड, सोलापूर) यांनी तक्रार केल्यामुळे जागेवरील बांधकाम परवाना रद्द करण्यात आला होता, तसे पत्रही प्राप्त झाले होते. 

जागेवरील बांधकाम परवाना मिळत नसल्याने लामकाने याने खोटा बनावट उतारा तयार केला. अ. कय्युम महिबूबसो सिद्दिकी याला ४ लाख ५८ हजार रुपये किमतीची जागा एक लाख रुपयास विकली. अ. कय्युम महिबूबसो सिद्दिकी याने महापालिकेकडे बांधकाम परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला. तत्कालीन बांधकाम परवाना अधिकारी शांताराम आवताडे, तत्कालीन नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी बाळासाहेब लामकाने यांच्याशी संगनमत रिवाईज बांधकाम परवाना क्रमांक १५१ दि. १७ जून २0१६ रोजी परवाना अधिकारी शांताराम आवताडे यांनी मंजूर केला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मासाळ हे तपास करीत आहेत.

माहिती अधिकारात उघड झाले सत्य...- फिर्यादीने म. अनिस बाबुलाल शेख यांना जागेवर सुरू झालेल्या बांधकामाबाबत संशय आला. माहिती अधिकारात माहिती घेतली असता खुल्या प्लॉटवर बेकायदा आणि बनावट कागदपत्रे सादर करून बांधकाम परवानगी मिळविल्याचे उघड झाले. त्यांनी तत्काळ आणि वेळोवेळी कागदपत्रे सादर करून सदरचा बांधकाम परवाना आणि या खुल्या प्लॉटवर बेकायदेशीरपणे देण्यात आलेला आहे. याची जाणीव करून दिलेली असतानाही नगर अभियंता संदीप कारंजे यांनी आर्थिक सांगड घालून अ. कय्युम महिबूबसो सिद्दिकी यांच्या नावे बांधकाम परवाना दि. ११ डिसेंबर २0१८ रोजी कायम केला. अधिकाºयांसह सात जणांनी फसवणूक केल्याची फिर्याद म. अनिस बाबुलाल शेख यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी