चार किलो गांजा जप्त; दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:50+5:302021-07-07T04:27:50+5:30

पंढरपूर : चार किलो गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी न्यायाधीशांनी ...

Four kilos of cannabis seized; Both were remanded in police custody for three days | चार किलो गांजा जप्त; दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी

चार किलो गांजा जप्त; दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी

पंढरपूर : चार किलो गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी न्यायाधीशांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोघे जण गांजा घेऊन सरगम चौकात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सरगम चौकात सापळा लावला. यावेळी प्रसाद गुणवंत कोळी (वय २४, रा. गणपती गल्ली, आंबेवाडी, जि. बेळगाव) व कार्तिक भारत चिखलकर (वय २४, रा. कंगराळी बु, जि. बेळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांजवळील बॅग तपासली असता त्यामध्ये ४१ हजार ९४० रुपये किमतींचा ४ किलो १९४ ग्रॅम गांजा मिळून आला.

या दोघांविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी फिर्याद दिली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण पवार करीत आहेत.

Web Title: Four kilos of cannabis seized; Both were remanded in police custody for three days