इंदापूरजवळ भीषण अपघातात चौघे ठार; गुरसाळेच्या तिघांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST2021-06-09T04:28:16+5:302021-06-09T04:28:16+5:30

मयतामध्ये जीममधील गणेश गोडसे (वय ३८), अविनाश कुंडलिक पवार (वय २८), बाळासाहेब साळुंखे (वय ६० सर्व रा.गुरसाळे) यांचा समावेश ...

Four killed in road mishap near Indapur; Including three of Gursale | इंदापूरजवळ भीषण अपघातात चौघे ठार; गुरसाळेच्या तिघांचा समावेश

इंदापूरजवळ भीषण अपघातात चौघे ठार; गुरसाळेच्या तिघांचा समावेश

मयतामध्ये जीममधील गणेश गोडसे (वय ३८), अविनाश कुंडलिक पवार (वय २८), बाळासाहेब साळुंखे (वय ६० सर्व रा.गुरसाळे) यांचा समावेश आहे. कारमधील एकाचे नाव समजले नाही.

इंदापूर शहराजवळ पुणे-सोलापूर हायवेवर असणाऱ्या पायल हॉटेलजवळ कार (एमएच ४६ बीई ४५१५) ही मोटार पुण्याकडे जात असताना, अचानक टायर फुटल्याने डिव्हायडर तोडून आउट साइडच्या दिशेने येऊन सोलापूरकडे जाणाऱ्या (एमएच १३ एझेड ३९०१) या जीपला जोरदार धडकली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.

गुरसाळे (ता.पंढरपूर) राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश गोडसे कामानिमित्त इंदापूर तालुक्यातील एका साखर कारखान्यावर गेले होते. परत येताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. गणेश गोडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, तसेच शरद पवार विचार मंचचे ते पदाधिकारी होते. मयत अविनाश पवार हे गोडसे यांच्या नात्यातील आहेत. या अपघातात जीममधील तिघे व कारमधील १ जण असे चौघे जागीच ठार झाले. या अपघातातील मृतांना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

फोटो

गणेश गोडसेसह अपघातातील चक्काचूर झालेली दोन्ही वाहने.

Web Title: Four killed in road mishap near Indapur; Including three of Gursale