शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सोलापूरला चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:08 IST

टाकळी जलवाहिनीवर शुक्रवारी शटडाऊन, दुरूस्तीचे काम सुरू

ठळक मुद्देएकीकडे सोलापूरचे तापमान ४२ अंशावर गेले पाण्याची मागणी दीडपटीने वाढलीशहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा चार दिवसाआड करण्याचे नियोजन आणखी ४ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. टाकळी जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार असल्याने हा बदल करण्यात आला आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकळी सोरेगाव मुख्य जलवाहिनीवर तेरामैलजवळील रिलायन्स पेट्रोल पंप, व्होनमुर्गी फाटा आणि नवीन विजापूर नाका अशा तीन ठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीतून दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे ही गळती दुरुस्ती करण्यासाठी टाकळी येथील पंप बंद करावे लागणार आहेत. यासाठी २७ एप्रिल रोजी सकाळी ११ नंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जुना विजापूर नाक्याजवळील गळती मोठी आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ३0 तासांचा कालावधी लागणार आहे. २८ एप्रिल रोजी दुपारी दुरुस्तीनंतर पंप सुरू केल्यावर पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. दुरुस्तीसाठी घेण्यात येणाºया शटडाऊनमुळे दीड दिवस पाणी उपसा न झाल्याने शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे २७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत तीन ऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

यापूर्वी औज व चिंचपूर बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर गेल्याने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. उजनीतून सोडलेले पाणी औजला पोहोचण्यास विलंब झाल्याने हा कालावधी वाढला. त्यानंतर गेल्या आठवड्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठयाचे वेळापत्रक कोलमडले. आता दुरुस्तीमुळे ही अडचण कायम राहिली आहे. एकीकडे सोलापूरचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी दीडपटीने वाढली आहे. अशात दुसरीकडे एकामागून एक अडचणी निर्माण होत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणी