बार्शीत चार दिवसांत १५४ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:41+5:302021-06-20T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : मागील काही दिवसांपासून बार्शीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मंगळवार ते ...

बार्शीत चार दिवसांत १५४ रुग्ण झाले बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : मागील काही दिवसांपासून बार्शीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांत १५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही दिलासा देणारी गोष्ट आहे.
१४ ते १७ जून या चार दिवसांत ७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शहर व तालुक्यात मिळून सध्या २३६ ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण बाधित आढळून आलेल्या ७२ रुग्णांमध्ये बार्शी शहरात २४, तर ग्रामीण भागातील ४८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली. चार दिवसांत विक्रमी ७,८२३ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात २,०६८ तर ग्रामीण भागात ५,७५५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.