महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ निवडणूकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:28 IST2018-02-23T15:23:49+5:302018-02-23T15:28:13+5:30
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंंडळाच्या निवडणुकीत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी सोलापूर-सांगली-कोल्हापूर जिल्हा या सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ निवडणूकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा अर्ज दाखल
आॅनलाइन लोकमत सोलापूर
करमाळा दि २३ : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंंडळाच्या निवडणुकीत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी सोलापूर-सांगली-कोल्हापूर जिल्हा या सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सूचक म्हणून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांची तर अनुमोदक म्हणून रामचंद्र शेळके यांच्या स्वाक्षºया आहेत. सोलापूर-सांगली-कोल्हापूर जिल्हा मतदारसंघात १५ मतदार असून त्यापैकी ९ मतदार सोलापूर जिल्ह्यातील आहेत तर ६ मतदार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. याच मतदारसंघातून इस्लामपूर येथील संपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
-------------------------
जगतापांचा एकमेव अर्ज
-सोलापूर जिल्ह्यातून माजी आ. जयवंतराव जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला असून जिल्ह्यातील नेतेमंडळींनी जगताप यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अखेर ८ मार्च असल्याने त्यावेळीच स्पष्ट होणार आहे.