अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST2021-09-11T04:23:35+5:302021-09-11T04:23:35+5:30

रामकुमार मेहतरू निषाद (२३ रा. चिंचुनिया ता. पाथरीया, जि. मुगेंली) असे मृताचे नाव आहे तर बुधारू बिहारी निषाद ...

Foreign worker killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

रामकुमार मेहतरू निषाद (२३ रा. चिंचुनिया ता. पाथरीया, जि. मुगेंली) असे मृताचे नाव आहे तर बुधारू बिहारी निषाद (२५ रा. अमेरिकापा, ता. बिलहा, जि. बिलासपूर, छत्तीसगड) जखमीचे नाव आहे.

सध्या हे दोघे कमलापूर (ता. सांगोला) येथे वास्तव्यास होते. रामकुमार व त्याचा मित्र बुधारू दोघे दुचाकीवरून नाझरे येथील बँकेत गावाकडे पैसे पैसे पाठविण्यासाठी गेले होते. परतताना सायंकाळी सांगोला-मिरज हायवेवरील वाटंबरे शिवारात सुभाष अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. दोघांवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. यात रामकुमार निषाद याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस नाईक प्रकाश कोष्टी यांनी गुरुवारी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे.

-----

Web Title: Foreign worker killed in unidentified vehicle collision