Food Recipes: 'फ्लाइंग डोस्या'नंतर आता आली 'हेलिकॉप्टर भेळ'! व्हिडिओ एकदा पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 18:36 IST2022-08-09T18:36:11+5:302022-08-09T18:36:49+5:30
Street Food: तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. या व्यक्तीची भेळ-पुरी बनवण्याची स्टाईल पाहून लोक चकीत झाले आहेत.

Food Recipes: 'फ्लाइंग डोस्या'नंतर आता आली 'हेलिकॉप्टर भेळ'! व्हिडिओ एकदा पाहाच...
Street Food: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारच्या रेसिपींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. फूड व्लॉगिंग करणारे दररोज आपला अनुभव शेअर करतात. यात अनेकदा काही आगळ्या-वेगळ्या रेसिपी आणि त्यांना बनवण्याची पद्धत पाहून सगळेच थक्क होतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात भेळ बनवण्याची पद्धत पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
'हेलिकॉप्टर भेळ-पूरी'
तुम्ही फ्लाइंग डोस्याबद्दल ऐकलं असेल, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका हेलिकॉप्टर भेळचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत तुम्ही एका व्यक्तीला भेळ बनवताना पाहू शकता. सुरुवातीला हा भेळवाला इतर भेळ वाल्यांसारखा सामान्य दिसतो, पण काही सेकंदात अचानक त्याच्या अंगात स्फुर्ती येते आणि तो हेलिकॉप्टरप्रमाणे हात फिरवू लागतो.
वीडियो देख ललचाने लगेगा मन
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्या व्यक्तीची भेळ बनवण्याची पद्धत पाहून, त्याला हेलिकॉप्टर भेळ असे नाव दिले आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची प्रचंड पसंती मिळाली असून, यावर विविध मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत.