शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

अवघ्या जिल्ह्याचे लक्ष, कोण साधणार विजयाचा ‘सुवर्ण मध्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 10:56 IST

सोलापूर शहर मध्य;  एमआयएम, महेश कोठे यांना अनपेक्षित साथ

ठळक मुद्देशहर मध्य मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात एक लाख ६७ हजार ५६९ मतदारांनी मतदान केलेयंदा ५५.४७ टक्के मतदान झाले

राकेश कदम

सोलापूर  : शहराशी संलग्न तीनपैकी दोन मतदारसंघाच्या निकालाचा सर्वांनाच अंदाज आला आहे. आता शहर मध्य मतदारसंघातील काही भागातून वेगवेगळे कौल येत आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेना आघाडीवर आहे, परंतु एमआयएम आणि महेश कोठे यांना अखेरच्या टप्प्यात चांगली साथ मिळाल्याने चर्चेत रंगत वाढली आहे. या वातावरण विजयाचा सुवर्णमध्ये कोण साधणार याकडे लक्ष आहे. 

शहर मध्य मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे दिलीप माने, माकपचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारुक शाब्दी, अपक्ष उमेदवार महेश कोठे यांच्यात खरी लढत झाली. एकूण तीन लाख दोन ११६ मतदारांपैकी एक लाख ६७ हजार ५६९ मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या निवडणुकीत ५८.९८ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.४७ टक्के मतदान झाले. रामवाडीपासून अशोक चौकापर्यंतच्या मतदान केंद्रावर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसली.

अशोक चौकापासून पूर्व भागात काँग्रेस, महेश कोठे, शिवसेना आणि माकप यांच्यात चुरस दिसली. शास्त्रीनगर, बापूजी नगर, विजापूर वेस या पट्ट्यात काँग्रेस आणि एमआयएमचा जोर होता. मतदारांचा कल लक्षात आल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे; मात्र या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचा ‘सायलेंट व्होटर’ आहे. तो उघडपणे चर्चा करण्याऐवजी शांतपणे महायुतीलाच साथ देतो. त्यामुळे दिलीप माने समर्थक विजयाच्या दाव्यावर ठाम आहेत.

असा झाला प्रचार- शिवसेना, एमआयएम आणि महेश कोठे यांच्या टीकेचा संपूर्ण रोख प्रणिती शिंदे आणि काँग्रेसवर अपेक्षित होता. परंतु, या तिघांनाही इतर  उमेदवारांवर टीकेचे बाण सोडावे लागले. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याच गोंधळावर बोट ठेवलेले दिसले. प्रणिती शिंदे यांनी प्रत्येक भाषणात ‘मी तुमची मुलगी आहे, मी तुमची बहीण आहे’, अशी भावनिक साद घातली. हे बाहेरचे लोक तुम्हाला काय देणार असा प्रश्न उपस्थित केला.

दिलीप माने यांनी काँग्रेस नेतृत्वाला निष्क्रिय ठरविताना रोजगार, उद्योग या मुद्यांना स्पर्श केला. त्यांच्या समर्थकांनी ‘हिंदुत्व’ हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. शाब्दी सुरुवातीला ठराविक वस्त्यांमध्ये रमले. यंत्रणा काहीशी विस्कळीत होती. कार्यकर्त्यांना तौफिक शेख यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. रोजगार, शिक्षण, सर्वांना स्वस्तात घरे, आरोग्य, सामाजिक सुरक्षा हे माकपच्या प्रचारातील मुद्दे होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्यPoliticsराजकारण