स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात ध्वजाच्या रंगांची फुलांची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:48+5:302021-08-17T04:27:48+5:30

प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्यास श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने ...

Flower decoration of flag colors in Shri Vitthal Temple on the occasion of Independence Day | स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात ध्वजाच्या रंगांची फुलांची आरास

स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात ध्वजाच्या रंगांची फुलांची आरास

प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्यास श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्तही विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्याचे आयोजन केले होते. यामुळे श्रीमंत मोर्या प्रतिष्ठानने मंदिरातील फुलांच्या सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. याची दखल घेत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी त्यांना सजावट करण्याची संधी दिली. ऑरकेट, कामिनी, शेवती, कार्नेशन अशा ७०० किलो फुलांची सजावट श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा, नामदेव पायरी, सोळखांबी परिसरात करण्यात आली आहे. यामुळे मंदिर अधिक आकर्षक दिसत होते.

फोटो :

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Web Title: Flower decoration of flag colors in Shri Vitthal Temple on the occasion of Independence Day