न्यायालयीन सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस दलातील पाच पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 20:33 IST2017-12-23T20:32:40+5:302017-12-23T20:33:44+5:30

न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कुºहाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले.

Five policemen in Solapur city police force suspended for defamation of judicial security | न्यायालयीन सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस दलातील पाच पोलीस निलंबित

न्यायालयीन सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस दलातील पाच पोलीस निलंबित

ठळक मुद्देकर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा परिणाम नागरिकांसह पोलिसांवरड्यूटीवरील कर्मचाºयांनी सजगता दाखवायला हवी : महोदव तांबडे कुºहाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कुºहाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मल्लिकार्जुन पालवे, शहर पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार भीमाशंकर मारूती वाघे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार वसंत चिंतामणी जैन, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक बाबुराव गावित, जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस ज्ञानदेव खंडू कोळेकर अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
पोपट शामराव नलावडे (वय ६७,रा. हळदुगे, ता. बार्शी) हा  माहिती अधिकाराखाली माहिती मागण्यासाठी २० डिसेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यु. बी. हेजीब यांच्या कोर्टात आला होता. अपील कामकाजासाठी येवून तो कागदपत्रावर पोहोच मागत होता. त्यावेळी पोहोच देता येणार नाही असे न्यायाधीशांनी सांगितले असता, त्याने सोबत आणलेली कुºहाड बाहेर काढली.  न्यायाधीश हेजीब यांनी न्यायालयात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाºयांना बोलावले. १० ते १५ मिनिटांनी पोलिस त्यांच्या कोर्टात उशीरा पोहोचले. पोलिसांनी यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली. आरोपीविरूद्ध कोणतीही कारवाई केली नाही. ही बाब पोलिसांची प्रतिमा मलीन करणारी असल्याने पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पाच पोलिसांना शनिवारी निलंबित केले.
यापूर्वी दोन नोव्हेंबर रोजी व्यंकटेश बंदगी हा आरोपी कुºहाड घेऊन आला होता. यावेळी हलगर्जीपणा केला म्हणून एका महिला पोलिसास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दुसºयांदा हा प्रकार घडला आहे.
----------
कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करण्यात आली.  ड्यूटीवरील कर्मचाºयांनी सजगता दाखवायला हवी होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा परिणाम नागरिकांसह पोलिसांवर होतो. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची होती.
- महोदव तांबडे
पोलीस आयुक्त

Web Title: Five policemen in Solapur city police force suspended for defamation of judicial security