शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पावणे पाच लाखाचा अपहार; सरपंच, ग्रामसेवकांसह लिपिकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:29 IST

फोंडशिरस येथील प्रकार : तिघांविरूद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देबनावट पावत्या खºया असल्याचे दाखवून पावतीवरून व्हाऊचर बिल तयार केलेखोट्या नोंदी ग्रामपंचायतच्या कॅशबुक रजिस्टरमध्ये घेतल्या होत्याही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे ग्रामपंचायतीच्या पावणे पाच लाख रूपयाचा विकास निधी अपहार केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक अन् लिपिकावर कारवाई करण्यात आली़  याप्रकरणी तिघांविरूद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तत्कालीन सरपंच दादा महादेव रणदिवे (वय ३४ रा. फोंडशिरस, ता. माळशिरस),  तत्कालीन ग्रामसेवक अशोक मुकूंद धार्इंजे (वय ५६ रा. जाधववाडी, बांभुर्डे ता. माळशिरस), ग्रामपंचायत लिपिक विजय खाशाबा बोडरे (वय ३९ रा. फोंडशिरस ता. माळशिरस) असे कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सरपंच व ग्रामसेवक हे २0१५ मध्ये कार्यरत होते. ४ एप्रिल २0१५ ते १0 डिसेंबर २0१५ दरम्यान फोंडशिरस ग्रामपंचायतीला १३ व्या वित्त आयोगातील ग्रामनिधीची चार लाख ७३  हजार ४९६ व पाणीपुरवठा खात्यातुन ११ हजार १00 रूपये असा एकूण चार लाख ८४ हजार ५९६ रूपये ग्रामसेवक अशोक धार्इंजे व सरपंच दादा रणदिवे यांनी स्वत:च्या अधिकारात काढुन घेतला. काढलेल्या रक्कमेतुन आवश्यक त्या वस्तु खरेदी न करता कामाच्या बनावट पावत्या तयार केल्या.

बनावट पावत्या खºया असल्याचे दाखवून पावतीवरून व्हाऊचर बिल तयार केले. खोट्या नोंदी ग्रामपंचायतच्या कॅशबुक रजिस्टरमध्ये घेतल्या होत्या. हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात आला, त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांनी या प्रकरणी चौकशी केली. पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी तपास केला. चौकशीमध्ये अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ चे कलम १३(१) (क), १३(२) तसेच भांदवि कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ), ३४ प्रमाणे तिघांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागmalshiras-acमाळशिरसgram panchayatग्राम पंचायत