ॲप डाउनलोड करण्यास सांगत विमा एजंटाच्या खात्यातून पाच लाख काढले
By दिपक दुपारगुडे | Updated: September 18, 2023 19:25 IST2023-09-18T19:25:37+5:302023-09-18T19:25:46+5:30
सोलापूर : अक्कलकोट येथील बँकेतून बोलत असून, पॅन कार्ड लिंक होत नाही. मोबाइलवर ॲप डाऊनलोड करण्यात सांगत विमा एजंटाच्या ...

ॲप डाउनलोड करण्यास सांगत विमा एजंटाच्या खात्यातून पाच लाख काढले
सोलापूर : अक्कलकोट येथील बँकेतून बोलत असून, पॅन कार्ड लिंक होत नाही. मोबाइलवर ॲप डाऊनलोड करण्यात सांगत विमा एजंटाच्या खात्यातून पाच लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सचिन शंकरराव बगले यांनी तक्रार दिल्याने उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शंकरराव बगले यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाकडून फोन आला. बँकेतून बोलत आहे. पॅन कार्ड लिंक होत नाही, आपल्या मोबाइल वरून ॲक्सिस बँकेचे खाते ॲप डाऊनलोड करा असे बगले यांना सांगण्यात आले. यानंतर बगले यांनी अनोळखी इसमाने सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली. अनोळखी इसमाने ॲपचा कस्टमर आयडी आल्याचा सांगत आलेला क्रमांक विचारला. त्यानंतर सोळा अंक टाइप करण्यास सांगितले.
बगले यांनी ही प्रोसेस पूर्ण केली. काही वेळाने याचा संशय आल्याने बँकेकडे जाण्यासाठी निघाल्यानंतर काही वेळातच त्यांना मोबाइलवर सेव्हिंग खात्यातून एक हजार, ९४ हजार, ९९ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. अनोळखी इसमाने काही वेळातच बगले यांच्या खात्यातून दोन दिवसांत ५ लाख ५ हजार ऑनलाइन काढून फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी हे करीत आहे.