गोदाम फोडून पाच लाखांचे सोयाबीन पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST2021-01-19T04:24:38+5:302021-01-19T04:24:38+5:30

बार्शी : तुळजापूर-बार्शी रोडवरील एका गोदामाचे कुलूप तोडून साडेपाच लाख रुपयांचे ७० कट्टे सोयाबीन पळविले. रविवारी मध्यरात्री हा प्रकार ...

Five lakh soybeans were looted from the warehouse | गोदाम फोडून पाच लाखांचे सोयाबीन पळविले

गोदाम फोडून पाच लाखांचे सोयाबीन पळविले

बार्शी : तुळजापूर-बार्शी रोडवरील एका गोदामाचे कुलूप तोडून साडेपाच लाख रुपयांचे ७० कट्टे सोयाबीन पळविले. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. दरम्यान, गस्तीवरील एका पथकाने सोयाबीनचा माल घेऊन जाणारा ट्रक पकडला असून पाच जणांना ताब्यात घेतले.

याबाबत गोदामच्या व्यवस्थापकाने बार्शी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मुन्ना सोनिग्रा यांचे विनियोग वेअर हाउसिंग काॅर्पोरेशनचे गोडाउन कदम वस्तीजवळ आहे.

हे गोदाम त्यांनी एका कंपनीस भाड्याने दिले आहे. कंपनीने ६० ते ७० किलो वजनाचे सोयाबीनचे कट्टे ठेवले होते. ५ ते ६ चोरट्यांनी रात्री गोदामाच्या शटर्सचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. १८ फूट उंचीवरील कट्टे खाली पाडून गोदामाच्या मागील बाजूस ट्रक लावून त्यात ते भरून नेले.

---

ट्रकचालकाच्या हालचालींनी संशय वाढवला

दरम्यान, बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पथक गस्त घालत होते. पोलीस हवालदार सचिन माने, सगरे व शहाणे हे लातूर रोडवर जामगाव (आ) येथे वाहन तपासणी करत होते. एका ट्रकचालकाच्या हालचालीवरून या पाेलीस पथकाला संशय आला. त्याची चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, या चालकासोबत असणारे काहीजण पळून गेले. पोलिसांनी राजेंद्र छगन काळे, बलाजी तानाजी शिंदे, सुनील दादा काळे, शहाजी अरून शिंदे (मासा ता. कळंब), अर्जुन सुब्राव शिंदे (मोहा) या पाच जणांना ताब्यात घेतले. ट्रकचालक विक्रम वाघमारे (रा. बाभुळगाव, ता. कळंब), पिल्या रवी काळे, शंकर रवी काळे, बबलू दादा काळे (सर्व रा. मासा) यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी ट्रकसह पाच जणांना ताब्यात घेतले.

Web Title: Five lakh soybeans were looted from the warehouse