विद्यमानसह पाच माजी सरपंच निवडणूक आखाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST2021-01-09T04:18:14+5:302021-01-09T04:18:14+5:30
पती-पत्नी निवडणूक रिंगणात माजी सरपंच बाबूराव सुर्वे व त्यांच्या पत्नी झेडपीच्या माजी महिला व बालकल्याण सभापती नंदाताई सुर्वे हे ...

विद्यमानसह पाच माजी सरपंच निवडणूक आखाड्यात
पती-पत्नी निवडणूक रिंगणात
माजी सरपंच बाबूराव सुर्वे व त्यांच्या पत्नी झेडपीच्या माजी महिला व बालकल्याण सभापती नंदाताई सुर्वे हे पती-पत्नी निवडणूक रिंगणात आहेत. तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गिड्डे यांच्या पत्नी सुनंदा गिड्डे या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग चारमध्ये अनिल सावंत यांनी पत्नीसह तीन उमेदवार अपक्ष उमेदवार मोडनिंब शहर विकास आघाडीच्या विरोधात उभे केले आहेत. माजी सरपंच शिवाजी पाटील यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाटील व सुनीता पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे.
सख्ख्या जाऊबाई आमने-सामने
प्रभाग एकमधून सोनाली शिंदे या मोडनिंब शहर विकास आघाडीतून, तर त्यांची सख्खी जाऊ योगिता शिंदे या मोडनिंब शहर स्वाभिमानी संघटनेतून निवडणूक लढवीत आहेत.