सोयाबीन चोरीप्रकरणी पाचजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:23 IST2021-01-20T04:23:24+5:302021-01-20T04:23:24+5:30

बार्शी : गोदामाचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचे सोयाबीन पळविल्याप्रकरणी बार्शी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यापैकी पाच जणांना ...

Five arrested in soybean theft case | सोयाबीन चोरीप्रकरणी पाचजणांना अटक

सोयाबीन चोरीप्रकरणी पाचजणांना अटक

बार्शी : गोदामाचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचे सोयाबीन पळविल्याप्रकरणी बार्शी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यापैकी पाच जणांना अटक केली.

स्टार एग्रो वेअर हाऊसिंग या कंपनीने खरेदी केलेले सोयाबीन बार्शी येथे एका गोदामात ठेवले होते. या गोदामाच्या शटर्सचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५ लाख ५० हजारांचे सोयाबीन पळविले. कंपनीचे राज्यप्रमुख कैलास आत्माराम काळबांडे (वय ४०, रा.उल्कानगरी, औरंगाबाद) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र काळे (वय ५०), बालाजी शिंदे (वय ३३), सुनील काळे (वय २३), शहाजी शिंदे (वय २५), अर्जुन शिंदे (वय ३५), अर्जुन शिंदे (सर्व रा.मोहा, ता.कळंब) तर चालक विक्रम वाघमारे (रा. बाभूळगाव, ता.कळंब) , पित्या काळे, शंकर काळे, बबलू काळे (रा. मासा, ता. कळंब) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून चौघैजण फरार झाले आहेत. गस्तीवरील पोलीस पथकाने सोयाबीनने भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Five arrested in soybean theft case