शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

वडाळ्यात सापडले पहिले स्त्रियांचे आत्मसमर्पण शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 11:03 IST

इतिहासाचे सर्वेक्षण; इतिहास संशोधक नितीन अणवेकर यांचे संशोधन

ठळक मुद्देअणवेकर यांनी जिल्ह्यातील सुमारे २३५ गावांचा ऐतिहासिक सर्व्हे केलानुकतेच वडाळा येथे स्त्रियांचे आत्मसमर्पण शिल्प सापडले जिल्ह्यातील स्त्रियांचे पहिले शिल्प असल्यामुळे या संशोधनास महत्त्व प्राप्त

सोलापूर : ऐतिहासिक सर्वेक्षण करताना उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे इतिहास संशोधक नितीन अणवेकर यांना स्त्रियांचे आत्मसमर्पण शिल्प सापडल्यामुळे इतिहास संशोधनास नवी दिशा प्राप्त झाली आहे. हे जिल्ह्यातील स्त्रियांचे पहिले शिल्प असल्यामुळे या संशोधनास महत्त्व प्राप्त झाल्याची माहिती अणवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अणवेकर यांनी जिल्ह्यातील सुमारे २३५ गावांचा ऐतिहासिक सर्व्हे केला असून, त्यांनी शिलालेख, शिल्प, मूर्ती, वीरगळ आदी दुर्मीळ शिल्पे उजेडात आणली आहेत़ नुकतेच वडाळा येथे स्त्रियांचे आत्मसमर्पण शिल्प सापडले आहे़ हे शिल्प दुर्मीळ असून साधारणत: तीन फूट उंच व दीड फूट रुंद आहे़ शिल्पपट दोन रकान्यात कोरलेला आहे. खालील रकान्यात मध्यभागी एका आसनावर एक स्त्री पद्मासन घालून बसलेली आहे. तिच्या दोन्ही बाजूस दोन स्त्रिया आहेत़ त्यांच्या डोक्यावरील अंबाड्यावरून स्त्री प्रतिमा स्पष्ट दिसते़ त्यांच्या डाव्या बाजूला असणाºया स्त्रीने तलवारीचा घाव घालून मध्यभागी बसलेल्या स्त्रीचे शरीर धडावेगळे केले आहे.

 शिरविरहित मानेतून रक्ताची चिळकांडी उडत आहे़ या शिल्पाच्या उजव्या बाजूस दुसरी स्त्री कापलेले शिर एका ताटात घालून डोक्यावरून घेऊन जात आहे़ ताटातील शिराच्या एका बाजूस अंबाडा दिसून येत आहे़ यावरून ही स्त्रीच आहे हे स्पष्ट होते, तर शिल्पाच्या वरील बाजूस दोन अप्सरा आहेत, असे शिल्पात दाखवले आहे़ अशी शिल्पे फारच तुरळक प्रमाणात आढळतात़ मनाचा थरकाप उडवून अंगावर रोमांच उभे रहावे, अशी काही भयावह व रक्तरंजित उदाहरणे इतिहासात फारच थोडी सापडतात, अशी माहिती नितीन अणवेकर यांनी दिली.

वडाळा येथे सापडलेल्या या शिल्पामुळे इतिहास संशोधकांच्या चर्चेचा विषय झालेला आहे़ या यशाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार, पुरातत्त्व शास्त्र संशोधक डॉ़ सत्यव्रत नुलकर, डॉ़ राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा़ एम़ एम़ मस्के, डॉ़ श्रीकांत येळेगावकर, प्राचार्य के. एम़ जमादार, डॉ़ नभा काकडे यांनी अणवेकर यांचे कौतुक केले आहे. 

नितीन अणवेकर यांना सापडलेले दुर्मीळ शिल्प म्हणजे अपूर्व उपलब्धी आहे़ यापूर्वी मंगळवेढा येथे अत्यंत देखणे व सुंदर  शिल्प वृत्तासह सापडले आहे़ अशा शिल्पांना वेळेवाळी शिल्प म्हणतात़ आपल्या आश्रित राजाला युद्धामध्ये यश प्राप्त व्हावे, म्हणून स्वयंस्फूर्तीने स्वत:चे बलिदान करून घेणारे गट असत़ त्यांना त्या काळी लेंकरू असेही म्हणत़ वडाळा येथील शिल्प स्त्रियांचे असल्यामुळे हे शिल्प वैशिष्टपूर्ण म्हणावे लागेल़ - आनंद कुंभार, इतिहास संशोधक

टॅग्स :Solapurसोलापूर