शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

आयएएसच्या पदोन्नतीत पहिले नाव; तरीही सीईओ प्रकाश वायचळ यांना केले अनफिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:25 AM

माहिती अधिकारात प्रकार उघड: उच्च न्यायालयात धाव घेण्याची केली तयारी

सोलापूर: आयएएसच्या पदोन्नतीत प्रथम क्रमांकाचे नाव असतानाही अनफिट दाखवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना डावलेले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. या अन्यायाबाबत उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे वायचळ यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने राज्यातील २३ अधिकाºयांची आयएएसच्या दर्जावर पदोन्नती केली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत रिक्त झालेल्या भारतीय प्रशासन सेवा (महाराष्ट्र राज्य संवर्ग) या पदावर या अधिक़ाºयांची पदोन्नतीने निवड केल्याचे भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी जाहीर केले. यादीत नाव न आल्याने वायचळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे विचारणा केली. 

पण तोवर गोवर्धन दिकोंडा व रामचद्र उबाळे यांनी माहितीच्या अधिकाºयात या पदोन्नती कशा झाल्या याची युनिय्न पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे माहिती मागितली. १४ सप्टेंबर रोजी युपीसीचे सचिव जी. सी. शहा यांनी दिलेल्या माहितीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. महाराष्ट्र शासनाने शिफारस केलेल्या नावांमधून समितीचे अध्यक्ष भारत व्यास यांच्या चार सदस्यीय समितीने ७ आॅगस्ट रोजी बैठक घेऊन पदोन्नतीचे नावे अंतिम केली. या समितीकडे आलेल्या नावांमध्ये महिले नाव सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांचे होते. त्यांच्या नावापुढे अनफिट असा शेरा मारून पदोन्नती नाकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चार जणांनाही वगळलेपदोन्नतीमध्ये ब्रीजीलाल बिबे, एस. सी. पाटील, सी. एच. पराटे, एस. टी. कादबाने यांनाही वगळण्यात आले आहे. या चार जणांबाबत कमिटीमध्ये चर्चा झाल्याचे नमूद केले आहे. चर्चेत या अधिक़ाºयांविरूद्ध चौकशी सुरू असल्याने नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पण वायचळ यांच्यावर चर्चा झालेली नसताना अंतिम यादीत फक्त अनफिट असा शेरा मारल्याचे दिसून येत आहे. 

यापूर्वी दोनवेळा अन्यायपदोन्नतीतून नाव कसे वगळले गेले याबाबत विचारले असताना वायचळ यांनी यापूर्वी दोनवेळा असा प्रकार घडल्याचे सांगितले. आतापर्यंतच्या सेवेत व्हेरी गुड असा शेरा असताना विभागीय चौकशीचे कारण दाखवून यापूवीं यादीत नाव समाविष्ट केले नव्हते. त्याबाबत कॅटमध्ये धाव घेतली असून, सुनावणी प्रलंबित आहे. आता फाईल व्यवस्थित क्लिअर असताना नाव वगळल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. 

अशी आहे वायचळ यांची कामगिरीवायचळ हे मूळचे औरंगाबादचे असून, ९ मार्च १९९४ रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली.२0१६ मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली. मराठवाड्यात त्यांनी बºयाची ठिकाणी विविध पदावर काम केले. १८ जुलै २0१९ रोजी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून पदभार स्वीकारला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद