शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास; सोलापूर जिल्ह्यातील २५०० शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 17:46 IST

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : राज्य शासनाने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल अठरा महिन्यानंतर आज शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एस.व्ही.सी.एस हायस्कूल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. स्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता.

त्यांच्यासमवेत माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, गटविकास अधिकारी राहुल देसाई, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शाळेचे मुख्याध्यापक कौलगी व शिक्षक वृंद उपस्थित होते. शाळेच्या आवारात स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वामी यांनी सांगितले की, कोरोनाची रूग्णसंख्या असल्याने पंढरपूर, माळशिरस, करमाळा आणि माढा तालुक्यातील 50 गावातील शाळा सुरू नाहीत. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व खाजगी माध्यमिक व प्राथमिक  (शहरी, ग्रामीण आणि नागरी) अशा 2549 शाळा आहेत. त्यापैकी 2500 शाळा सुरू झाल्या आहेत. उर्वरित शाळा 10 ऑक्टोबरपासून सुरू होतील. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग आज सुरू झाले. शाळा परिसरात हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असून आजचा दिवस हा शिक्षण उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थी, पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सोलापूर जिल्ह्यात एकूण 5 लाख 58 हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी आज पहिल्या दिवशी 48 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शासनाच्या निर्देशानुसार एका बेंचवर एक अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एक दिवसाआड विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. सुरू झालेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती होती. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम शाळा बंद असताना लोकसहभागातून राबविल्याने सव्वा दोन हजार शाळा स्वच्छ झाल्या आहेत.

स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्यांनी वर्गात कोविडविषयक घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी व उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी शाळेला स्वामी यांनी भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी होटगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हत्याळीकर, उपशिक्षक पतंगे, सय्यद, ठाकूर, उपशिक्षिका कुलकर्णी, ढंगे, वनस्कर, जगताप, मजरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा सुरवसे, पदवीधर शिक्षक शकीला इनामदार, प्रकाश राज शेट्टी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, केंद्रप्रमुख सी.रा. वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

एकुरके येथील शाळा उत्साहात सुरु

मोहोळ तालुक्यातील एकुरके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्साहात सुरू झाली आहे. पाचवी ते आठवी एकूण पट 105 तर एकूण उपस्थिती 99 होती. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने मुलांचे गुलाब पुष्प व पेढे देऊन स्वागत केले. यावेळी मुलांची थर्मामीटरने तपासणी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत कोल्हाळ, उपसरपंच पृथ्वीराज ढवण, अण्णासाहेब साठे, रमेश ढवण, बापू कारंडे, मुख्याध्यापक सुधाकर काशीद, उपशिक्षक नंदकुमार भडकवाड, प्रफुल्ल शेटे, राजेंद्र मोटे, भागवत वाघ, सुभाष कल्याणी आदी उपस्थित होते.

शाळा आढावा....

एकूण शाळा 2549 सुरू शाळा 2500 पैकी 1923 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी ग्रामीण.305 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शहरी.272 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी नागरी.एवढ्या शाळा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद