कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी ठरले, डौलापूरचे भोयर दाम्पत्यांना मिळाला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:07 PM2020-11-25T12:07:23+5:302020-11-25T12:09:35+5:30

कार्तिकी वारी; पंढरपुरात संचारबंदी; साधेपणाने होणार यात्रा

Finally settled; The Bhoyar couple of Doulapur got the honor of Warakaris during the Karthiki Yatra | कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी ठरले, डौलापूरचे भोयर दाम्पत्यांना मिळाला मान

कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी ठरले, डौलापूरचे भोयर दाम्पत्यांना मिळाला मान

googlenewsNext

पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर (वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) या दाम्पत्यांची निवड झाली आहे.

उपमुख्यमंत्र्यांसोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे.

२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास
पहारा देणारे विणेकरी यांची उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण ६ विणेकांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने
कवडुजी नारायण भोयर (वय ६४, रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांची दि.
२२ नोव्हेंबर २०२० रोजी निवड करण्यात आली आहे.

कवडुजी नारायण भोयर हे मागील ९ ते १० वर्षांपासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वत: व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील ८ महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.

त्याप्रमाणे कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर ( वय ५५) दापत्याची कार्तिकी एकादशी दिवशी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीं विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी निवड करण्याबाबत मंदिर समितीचे सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अँड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

Web Title: Finally settled; The Bhoyar couple of Doulapur got the honor of Warakaris during the Karthiki Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.