एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:55+5:302021-02-05T06:42:55+5:30

बार्शी : बार्शी तालुक्यातील एका गावात सालगडी पाच वर्षांच्या मुलीशी असभ्य वर्तन करताना आढळला. याबाबत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा ...

Filed a case against a minor girl for behaving rudely | एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

बार्शी : बार्शी तालुक्यातील एका गावात सालगडी पाच वर्षांच्या मुलीशी असभ्य वर्तन करताना आढळला. याबाबत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

३० जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या आजीने तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी धनंजय पुणेकर याच्याविरुद्ध भा.दं.वि. ३५४ अ बाल लैगिक अत्याचार अधिनियम २०१२ च्या कलम ७ व ८ नुसार गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी आजी या नातीला घेऊन केळीच्या बागेत काम करीत होत्या. जवळच्या शेतात आरोपी हा सालगडी म्हणून काम करतो. काही वेळाने नात दिसली नसल्याने तिचा शोध घेतला असता संबंधित आरोपी हा तिच्या सोबत असभ्य वर्तन करताना आढळला. आजी मोठ्याने ओरडताच त्याने तेथून पळ काढला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज सूर्यवंशी करत आहेत.

Web Title: Filed a case against a minor girl for behaving rudely