मंद्रूपच्या खासगी सावकारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST2021-07-28T04:23:41+5:302021-07-28T04:23:41+5:30

मंद्रूप येथील पुंडलिक विठ्ठल माने यांनी कपड्याच्या व्यवसायासाठी सिद्धाराम पाटील यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. ...

Filed a case against Mandrup's private lender | मंद्रूपच्या खासगी सावकारावर गुन्हा दाखल

मंद्रूपच्या खासगी सावकारावर गुन्हा दाखल

मंद्रूप येथील पुंडलिक विठ्ठल माने यांनी कपड्याच्या व्यवसायासाठी सिद्धाराम पाटील यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. सिद्धाराम पाटील यांनी पुंडलिक माने यांच्याकडून घेतलेल्या मूळ रक्कम दोन लाखांपोटी आतापर्यंत व्याजासह पाच लाख ६० हजार रुपये परत दिले. रक्कम घेताना फिर्यादी पुंडलिक माने यांच्याकडून कोरे चेक व बॉण्ड घेतले होते. रक्कम व्याजासहित दिल्यानंतर त्यांनी कोरे चेक आणि बॉण्ड परत करण्याची मागणी केली. सिद्धाराम पाटील यांनी व्याजासह पाच लाख ६० हजार रुपये दिल्याशिवाय चेक मिळणार नसल्याचे सांगितले, कोर्टात खेचण्याची दमदाटी केली. कपड्याच्या दुकानात येऊन वारंवार त्रास दिला, अशी फिर्याद पुंडलिक माने यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार सिद्धाराम पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४चे कलम ३९, ४५ अन्वये मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पोलीस महिंद्रकर अधिक तपास करीत आहेत.

----

Web Title: Filed a case against Mandrup's private lender