शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; हिंदू महासभेची मागणी, सोलापुरात दिली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:11 IST

सोलापूर : भारतमातेचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून देशाचा अपमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल ...

ठळक मुद्देफौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार भारतमातेचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून देशाचा अपमान केल्याप्रकरणीदेशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी हिंदू महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी केली

सोलापूर : भारतमातेचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून देशाचा अपमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी हिंदू महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी केली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. 

राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यंगचित्र काढले आहे, यामध्ये त्यांनी भारतमातेचे चित्र रेखाटले असून तिला फाशी दिली आहे. भारतमातेला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दोरीने फाशी देत असल्याचे व्यंगचित्र त्यांच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर प्रसिद्ध केले आहे. 

व्यंगचित्र काढून त्यांनी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. राज ठाकरे यांनी  भारत मातेचा सरळ सरळ अपमान केला असून, संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या कृत्यासाठी राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी तक्रारी अर्जातून केली आहे. 

धमक्या आल्या तरी घाबरणार नाही : बहिरवाडेराज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशी व्यंगचित्रे काढून भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. गणपती, श्री राम यांचेही व्यंगचित्र काढून राज ठाकरे यांनी नाराजी ओढवून घेतली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेचे व्यंगचित्र काढल्याने आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. राजकीय विषयावर त्यांनी काही करावे, काही गोष्टींमध्ये आम्हीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध केला आहे.

भारतमातेचे विडंबन करण्याचा त्यांना अधिकार नाही.- फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी याची चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना भेटून सोलापुरात गुन्हा दाखल करून जिथे व्यंगचित्र काढले आहे, तिथे वर्ग करण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीने केली जाणार आहे, असे सुधाकर बहिरवाडे यांनी सांगितले.

शिवसेनेचा पाठिंबा...- भारत मातेला फाशी देणारे व्यंगचित्र काढल्याप्रकरणी हिंदू  महासभेच्या निषेधाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. ते आमच्या सोबत असल्याची माहिती सुधाकर बहिरवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेHindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीCrime Newsगुन्हेगारी