मारामारी, दमदाटी करणारा रवी निकम सोलापूर सह तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

By रूपेश हेळवे | Updated: March 5, 2023 19:20 IST2023-03-05T19:16:53+5:302023-03-05T19:20:19+5:30

मारामारी, दमदाटी, गौण खणिज चोरी करणारा सराईत गुन्हेगार रवी प्रकाश निकम ( वय ३५, रा. दक्षिण कसबा ) याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

Fighting, violent Ravi Nikam banned from three districts including Solapur for two years | मारामारी, दमदाटी करणारा रवी निकम सोलापूर सह तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

मारामारी, दमदाटी करणारा रवी निकम सोलापूर सह तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

सोलापूर :

मारामारी, दमदाटी, गौण खणिज चोरी करणारा सराईत गुन्हेगार रवी प्रकाश निकम ( वय ३५, रा. दक्षिण कसबा ) याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. निकम याला सोलापूर शहर व जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार
केले आहे. याबाबत पोलिसांनी नुकतेच आदेश दिले आहेत.

आगामी काळात विविध जातीधर्माचे सण उत्सव मिरवणूका निघणार आहे. शिवाय महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने रवी निकम याला तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका व फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीत मारामारी, दमदाटी, गौण खनिज चोरी अशा प्रकारचे विविध गंभीर स्वरूपाचे एकुण ८ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दिले. त्यास शनिवार ४ मार्च २०२३ पासून विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेवून, सोलापूर शहर व जिल्हा उस्मानाबाद जिल्हा, तसेच पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलिस निरिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी पत्राव्दारे दिली.

Web Title: Fighting, violent Ravi Nikam banned from three districts including Solapur for two years