देशासाठी लढता लढता हात पिवळे होण्याचे राहूनच गेले, पंढरीचा सुपुत्र शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:25 PM2020-05-17T17:25:40+5:302020-05-17T17:53:23+5:30

गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी चकमकीत पुळूज (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील धनाजी होनमाने गडचिरोलीत शहीद

Fighting for the country, his hands kept turning yellow | देशासाठी लढता लढता हात पिवळे होण्याचे राहूनच गेले, पंढरीचा सुपुत्र शहीद

देशासाठी लढता लढता हात पिवळे होण्याचे राहूनच गेले, पंढरीचा सुपुत्र शहीद

googlenewsNext
ठळक मुद्देनक्षलवादीविरोधात शोधमोहिम राबविताना आले वीरमरणनक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यूशहीद होनमाने यांचे वृत्त समजतान पुळूज गावावर शोककळा

पंढरपूर: गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी चकमकीत पुळूज (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील धनाजी तानाजी होनमाने ( २९)  हे शहीद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी यांचा साखरपुडा झालेला होता. चार महिन्यापूर्वी ते गावाकडे येऊन गेले होते, धनाजी होनमाने शहीद झाल्याचे वृत्त समजताच पुळूज सह पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

२९ एप्रिल २०१५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पुणे येथे त्यांची नियुक्ती झाली होती. २०१७ मध्ये पुणे येथून त्यांचे गडचिरोली येथे बदली झाली. अकरावी-बारावीचे शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात घेतल्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण हे पुणे येथून घेतले होते. गडचिरोली येथे बदली झाल्यानंतर त्यांनी नक्षलवाधांविरोधातील धाडसी कारवायांमध्ये सहभाग नोंदवला होता. या कामगिरीबद्दल त्यांचा पोलिस महानिरिक्षक यांच्याकडून सन्मानही करण्यात आलेला होता. अलीकडेच त्यांचा साखरपुडा झालेला होता. विवाह होण्याआधीच त्यांना वीर मरण आले आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

 

Web Title: Fighting for the country, his hands kept turning yellow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.