The festival of charity and Pune is Makar Sankrant ...! | दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत...!

दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत...!

दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांति म्हटलं जातं. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात

मकर संक्रांतच्या दिवशी बरेच महत्वाचे ग्रह एकत्रित येतात. या दिवशी सूर्य, शनि, गुरु, बुध आणि चंद्र मकर राशीत राहतील. जे शुभ योग निर्माण करतात. म्हणूनच या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद आणि समृद्धी आणते.

स्नान आणि दानाचं महत्त्व काय?
मकर संक्रांतच्या दिवशीच भागीरथच्या विनंती आणि तपस्येने प्रसन्न होऊन गंगा त्यांच्या मागे-मागे कपिल मुनी यांच्या आश्रमात पोहोचली आणि तिथून ती समुद्रात जाऊन मिसळली. याच दिवशी राजा भागीरथने गंगेच्या पवित्र जलने आपल्या पूर्वजांचं तर्पण केलं होतं. त्यामुळे मकर संक्रांतच्या दिवशी गंगेत स्नान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायी मानलं जातं.

यादिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्तता मिळते. यादिवशी केलं जाणारं स्नान आणि दान वैकुंठात असलेल्या देवांपर्यंत पोहोचतं, अशी मान्यता आहे. जे लोक गंगेत स्नान नाही करु शकत ते घरीच पाण्यात गंगा जल मिसळून स्नान करु शकतात.

मकर संक्रांतचा शुभ मुहूर्त
यावर्षी मकर संक्रांतला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करु शकता. तसेतर नेहमी हा सण 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते.

मकर संक्रात पूजाविधी
मकर संक्रातच्या दिवशी अंघोळ करुन सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला पूजा करतात. नंतर विवाहित स्त्रिया सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरतात. हे सुगडं पाटावर ठेवून त्या भोवती रांगोळी काढली जाते. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवलं जातं. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करुन तीळगूळ वाटतात. तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करु शकता.

दक्षिणायन-उत्तरायण
आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. 21 मार्च ते 21 जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो. या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.

भीष्म पितामह यांचा शरीर त्याग
मकर संक्रांतचा दिवश वैकुंठ प्राप्त करण्याचा दिवस आहे. भीष्म पितामहने मकर संक्रांतच्या दिवशीच्या प्रतिश्रेत तब्बल नऊ दिवस कुरुश्रेत्रात बाणांच्या शैयैवर होते. मकर संक्रांतच्या दिवशी त्यांनी त्यांच्या शरिराचा त्याग केला.

- अभिनंदन गायकवाड, सोलापूर

Web Title: The festival of charity and Pune is Makar Sankrant ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.