शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

coronavirus; एकीकडे कोरोनाचे भय अन् दुसरीकडे अफवांचे ढीगभर पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:08 IST

सोलापूरकरांचे जागरण; एकुलता एक मुलगा असल्यास झोपायचे नाही

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला नागरिक हे घरातच बसून आहेत, यामुळे अशा अफवांना पेव फुटत आहेअफवांना बळी पडलेल्या सोलापूरकरांना अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे

रुपेश हेळवे 

सोलापूर : एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने सर्वांची झोप उडवली आहे तर दुसरीकडे सोलापुरात विविध अफवांना पेव फुटले आहे़ सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून ज्यांच्या घरात एक मुलगा आहे त्यांनी रात्री झोपायचे नाही आणि मुलालाही झोपू द्यायचे नाही अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे़ यामुळे अफवांना बळी पडलेल्या सोलापूरकरांना अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ यामुळे नागरिक हे घरातच बसून आहेत़ यामुळे अशा अफवांना पेव फुटत आहे़ या अफवा शक्यतो कामगार वस्तीमध्येच फैलावत आहेत. यामुळे याला बळी पडणाºयांमध्ये कामगारांची संख्या जास्त आहे़ मंगळवारी कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी ९ घरातून १ तांब्या पाणी घेऊन येऊन ते पाणी लिंबाच्या झाडाला घालावे अन्यथा कोरोनाचा प्रकोप आपल्या घरावर होईल अशी अफवा सोलापुरातील भागात पसरवण्यात आली़ यामुळे अनेक लोक हे या अफवेला बळी पडले.

बुधवारी दुसरी अफवा पसरवण्यात आली़ यात ज्यांच्या कुटुंबामध्ये एक मुलगा किंवा दोन मुले आहेत त्यांनी रात्री झोपू नये अशी अफवा पसरवण्यात आली़ यामुळे या अफवेला बळी पडत अनेकांनी अख्खी रात्र जागून काढली़ अशा अफवांमुळे सामान्य नागरिकाचा बळी जात आहे़ यामुळे अशा अफवा पसरवणाºयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

दुपारी झोपू नका नाहीतर... कायमचे झोपाल - सोलापुरात अनेक अफवा पसरत असून गुरुवारी आणखीनच नवीन अफवा पसरवली आणि गुरुवारी दुपारी झोपू नका नाहीतर तुम्ही कधीच उठणार नाही अशी अफवा पसरवण्यात आली़ यामुळे अनेकजण दुपारची वामकुक्षीही घेऊ शकले नाहीत.

नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये़ अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये़ काही समाजकंटक आपण काहीतरी वेगळेपण करतो हे दाखवत असतात़ स्वत:ची प्रसिद्धी करायची असते म्हणून असे संदेश पाठवत असतात़ हे पूर्णत: चुकीचे आहे़ यामुळे अशांवर विश्वास ठेवू नये़- पुंडलिक मोरे,

कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर 

कोरोना व्हायरसपासून सुरक्षा मिळण्यासाठी ९ घरातून तांब्याभर पाणी आणून लिंबाच्या झाडाला घालावे असे सांगितले होते़ त्यामुळे भीतीपोटी आम्ही ही प्रथा पाळली़ - ममता गोणे, नागरिक 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल